बाळ विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे तपासा

वणी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: दत्तक देण्याच्या नावाखाली नवजात मुलं मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेटची सखोल चौकशी करून त्यांच्या विरुद्द कठोर कारवाई करा. अशी मागणी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात वणी येथील बेटी फाउंडेशनचे नाव समोर आले असून शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बेटी फाउंडेशनचा निषेध करण्यात आला आहे.

नुकतेच वणी येथील बेटी फाउंडेशनची संस्थापिका प्रीती दरेकर तिचे पती कवडू दरेकर व इतर दोन महिलांना 21 दिवसाची नवजात मुलीची दत्तक देण्याच्या नावावर साडे तीन लाख रुपयात विक्री करताना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी बाळाचे आईवडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अकोला येथील महिला व बाल कल्याण संस्थेची अध्यक्ष पल्लवी संजय कुलकर्णी यांच्या सजगतेमुळे या रॅकेटचा भांडाफोड झाला होता.

सोशल मीडियाच्या गैरवापर करुन बेटी फाउंडेशनची संचालिका प्रीती दरेकर हिने नवजात बाळ विक्रीचा घाट रचला होता. मात्र बाळ विक्री करण्यापूर्वीच तिचे बिंग फुटले आणि तिला कारागृहात जावं लागले. राष्ट्रवादी कांग्रेस महिला आघाडी तर्फे घडलेल्या प्रकरणाचे निषेध नोंदवून घटनेची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी वणी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकार, शहर अध्यक्ष राजाभाऊ बिलोरिया, राकांप तालुका अध्यक्ष सुर्यकांत खाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई आगबत्तलवर, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, आशा टोंगे, मंगला टोंगे, वैशाली तायडे, रामकृष्ण वैद्य .मारोती मोवाडे, गजेंद्र काकडे, किशोर ठेंगणे, राजेंद्र जेनेकर, पद्माकर देवाळकर, कमलाकर देवाळकर, सुनील पानघाटे , राजू उपरकर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.