वणीच्या महिलांनी नाट्य स्पर्धा जिंकली

0

सागर मुने, वणी: शहरातील महिलां कलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महिला एकांकिका स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्यांनी प्रथमच स्पर्धेत सहभाग घेतला. ऑपरेशन दगड या नाटकाचे चंद्रपूर येथे कामगार कल्याण महाकाली केंद्रा तर्फे ही एकांकिका सादर करण्यात आली.

या स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शक सागर मुने यांना द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले व प्रथमच नाटकात काम करणारी पल्लवी मसराम हिला उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला. वृंदा काळे, नंदा गुहे, पूजा कोवे, रेणुका आमटे, चैताली चौधरी, पूजा देवाळकर या कलावंतांनी यात काम केले तसेच अजित खंदारे, अभिलाष राजूरकर, शुभम उगले, प्रशांत चौधरी यांनी एकांकिकेला सहकार्य केले

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!