0

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व गाडगेबाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन व अकरा वर्षीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु. सई पंचभाई यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील नगर पंचायतच्या पटांगनावर दिनांक 29 ते 31 डिसेंबर पर्यंत हे सम्मेलन रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार हंसराजजी अहीर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. करमसिंग राजपूत असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.माणिक ठीकरे, कृष्णाजी लांडे, अनिल नावडे, सुरेश सोनटक्के, गंगाधर लोनसावळे महाराज, गजानन कीन्हेकर, महेश चौधरी हे राहणार आहे.

दैनंदिन कार्यक्रमात दिनांक 29 डिसेंबरला पहाटे 5 वाजता गुरुदेव सेवा मंडळाच्या उपासकाचे ध्यान, सकाळी 7 वाजता तुकडोजी व गाडगे महाराज व झाड़ू यांचे प्रतिमा पुजन व लगेच मारेगाव शहरातून स्वच्छता प्रभात फेरी, दुपारी 1 वाजता भजन सम्मेलनाचे उद्घाटन व प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. 3 वाजता भजनाचा कार्यक्रम होणार असून साय.6 वाजता सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी 8 वाजता बालकीर्तनकार सई पंचभाई यांचे प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम व 10 वाजता भजन सम्मेलनाला सुरवात होणार आहे.

या भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन स्पर्धत पुरुष गट, महिला गट व बाल गटा साठी विविध प्रोत्साहन पर बक्षिसे ठेवण्यात आली असून, या कार्यक्रमचा लाभ मारेगाव परिसरातील तमाम नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ.माणिक ठीकरे व अखिल भारतीय गूरूदेव सेवा मंडळ, गाडगे बाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावने केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.