आज संध्याकाळी 6 वा. रंगनाथ स्वामी मंदिरात भजन संध्या

रामराज्य ग्रुपद्वारा आयोजन, भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातील प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवारी संध्याकाळी 6 वाजता भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे. श्री रंगनाथ स्वामी सेवा समितीद्वारे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 12 वाजता जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यानंतर आज शनिवारी 16 ऑगस्ट रोजी 9 वाजता राजनाथ स्वामी मंदिरातून पालखीचे आयोजन करण्यात आले. दुपारी 12 वाजता दहीहंडी कार्यक्रम ठेवण्यात आला. याचा दिवशी 1 ते 3 वाजता दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. जन्माष्टमी महोत्सवाची भजन संध्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Comments are closed.