भाकपाचे अठरावे त्रेमासीक अधिवेशन मारेगावात संपन्न
तालुका सचिवपदी कॉ. बंडु गोलर यांची एकमताने निवड
ज्योतिबा पोटे, मारेगाव: दर तीन वर्षांनी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका शाखेपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यत पक्षाची ध्येयधोरणे व नविन कार्यकारणीची निवड केल्या जाते. यात गेल्या तीन वर्षाचा राजकिय, संघटात्मक बांधनीचा आढावा अधिवेशनातुन घेतल्या जातो. यावेळी हे अधिवेशन मारेगावात जानेवारीला स्थानिक कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाले.
या कार्यक्रमात विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कम्युनिस्ट पक्षाचे वणी तालुका सचीव कॉ. धनंजय आंबटकर होते. उद्धघाटक म्हणून यवतमाळ. जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे होते. यात विविध पदावर असलेल्या तीस पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले. यात सर्वानुमते मारेगाव तालुका सचिवपदी म्हणून कॉ. बंडु गोलर यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे स्वत:च्या मालकीचे भव्य असे कार्यालय असुन त्या अधिवेशनात दिवंगत कॉ नथ्यु पाटील किन्हेकर व दिवंगत कॉ विठ्ठलराव वखनोर यांच्या पक्षाच्या योगदाना बद्दल त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहून अधिवेशनाला सुरवात झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुंडलिक ढुमणे, धनराज अडबाले, सुरेखा हेपट, संजय भालेराव, हिम्मत पाटमासे, डॉ. श्रीकांत तांबेकर, राकेश खामनकर, लता रामटेके,प्रफुल आदे, बंडु उज्ववलकर ईतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.