जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात अनेक ठिकाणी बंद असलेले व सुरक्षा रक्षक नसलेले कारखान्यातुन लोखंडी भंगार तसेच केबल तार चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटना पाहता शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी गुन्हे प्रतिबंध व आरोपी अटक करणेबाबत विशेष मोहीम राबविणे करीत 3 पथक तयार केले. पथकाने विविध ठिकाणी धडक कार्यवाही करून 8 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 2 लाख 17 हजार 300 रुपयांचे चोरी झालेले मुद्देमाल जप्त केले.
पोलिसांनी अक्षय व्यंकटी तलांडे (25), आकाश मल्हारी भगत (29), प्रफुल दिपक गीरी (22), श्रीकांत सुरेश आगदरी (28), नासिफ निजामुद्दीन शेख (31), महेश वासुदेव दुर्गे (22) सर्व रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर, सुखदेव केशव झाडे (21) रा. शिंदोला, ता. वणी व राजेश मारोती खदरे (28) रा. दहीफळ ता. नेर असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. आरोपिकडून गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरण्यात आलेले वाहने असा एकुण 2 लाख 17 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयांचा सखोल तपास सुरू आहे.
सदर प्रकरणाचे तपासात पोलीसांनी तांत्रीक व पारंपारीक पध्दतीचा उपयोग करून तिनही गुन्हयातील आरोपीतांचा शोध लावुन सदर गुन्हयात अद्यापावेतो एकुण ८ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, पोउपनि राम कांडुरे, प्रमोद जुनुनकर, गुणवंत पाटील, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, अंकुश कोहचाडे, गजानन सावसाकडे यांनी पार पाडली.
शिरपुर पोलीसांच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी बाहेरगावी जातेवेळी मौल्यवान वस्तु अगर रोख रक्कम घरी ठेवु नये त्याचप्रमाणे बंद असलेली कारखाने व इतर आस्थापने याठिकाणी वैयक्तीक सुरक्षा रक्षकांची नेमणुक करून सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
सचिन लुले : ठाणेदार, पो.स्टे. शिरपूर