उकणी वेकोलि खाणीतून 3 लाखांच्या भंगाराची चोरी

कुंपणच खाते शेत.. वेकोलि अधिकारी व ट्रक चालकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उकणी खाणीतील वेकोलिचे साडे नऊ टनाचे भंगार चोरी करण्यात आले. हे भंगार लोड करून वणीतील एका भंगारच्या दुकानासमोर उतरवण्यात आले. 26 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी भंगार चोरून वाहतूक करणारे आयचर वाहन पकडून शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी वाहन चालक व वेकोलि उपप्रबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या भंगार चोरीत वेकोलिचाच अधिकारी असल्याचे समोर आल्याने कुंपणच शेत खात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

26 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास उकणी येथील विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे 9.5 टन वजनाचे जुने भंगार (किंमत अंदाज अंदाजे 2 लाख 85 हजार) एका आयचर गाडीने (MH 40 CM 6928) चोरून नेल्याचे सुरक्षा रक्षकांना समजले. वेकोलिचे गार्ड व एमएसएफचे गार्ड यांनी संयुक्त मोहिम राबवून वाहनाचा परिसरात शोध घेतला, सदर आयशर ट्रक भालर येथे सापडला. या ट्रकचा चालक अतुल गजानन पिदुरकर रा. कोलार पिंपरी याला विचारणा केली असता, भंगार चोरीचे पितळ उघडे पडले.

वाहन चालकाने सांगितले की सदर भंगार हे वेकोलीचे उप प्रबंधक अनुप कुमार साही यांच्या सांगण्यावरून भंगार गाडीत भरण्यात आले. सदर भंगार दीपक चौपाटी येथील सत्तार भाई दुकानाचे बोर्ड असलेल्या दुकानाच्या समोरील रस्त्याच्या बाजूला उतरवीला आहे. या माहितीवरून वेकोलिचे सुरक्षा रक्षक व एमएसएफचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहन व मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी माल व वाहन शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उकणीचे उपक्षेत्रिय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांनी तक्रार केली. तक्रारीवरून आरोपी उपप्रबंधक अनुपकुमार साही, वाहनचालक अतुल पिदुरकर या दोघांविरुद्ध ३०३ (२), ३०६, ३ (५) नुसार गुन्हे दाखल केला आहे. भंगार चोरीच्या घटनेत एका अधिका-याचेच नाव समोर आल्याने कुंपणच शेत खात असल्याचे बोलले जात आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )

https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.