भंगार चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वेकोलिच्या खाणीतून चोरले होते भंगार

0

विवेक तोटेवार, वणीः तालुक्यातील पिंपळगाव खाणीतून भंगार चोरणा-या अट्टल चोरट्याला वणी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. 4 जून रोजी सदर चोरट्याने पिंपळगाव खाणीतून भंगार लांबविले होते. त्याच्या साथीदारास त्याच वेळी अटक करण्यात आली होती. तर त्याचा दुसरा साथीदार फरार होता. त्याच्या साथीदाराची जामिनावर सुटका झाली आहे. परंतु आता फरार आरोपीस पकडण्यात वणी पोलिसांना यश मिळाले आहे.

अट्टल चोरटा जतीनसिंग उर्फ कालु सज्जनसिंग राहणार भालर वसाहत व त्याचा साथीदार धनराज येसेकर राहणार गणेशपूर याने जून महिन्याच्या 4 तारखेला पिंपळगाव खाणीतून 6 हजार रुपयांचे भंगार चोरले होते. हे चोरी केलेले साहित्य त्यांनी जंगलात लपवून ठेवले होते. धनराज याच्या जबाणीवरून साहित्य तर पोलिसांना मिळाले. परंतु जातींदरसिंग हा फरार होता.

महत्वाचे म्हणजे 2016 मध्ये जातींदरसिंग याच्या घरून पोलिसांनी 5 शस्त्र जप्त केले होते. या घटनेत त्याच्यासोबत आणखी चार आरोपी होते. विशेष म्हणजे जातींदरसिंग हा पोलिसांना गवसला नव्हता. परंतु सोमवारी रात्री त्यास त्याच्या राहते घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कलम 379, 569 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बलादहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन वनोळे करीत आहे.

जतींदरसिंग याचे वडील हे वेकोलीत नोकरीवर होते. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर मुलगा जातींदरसिंग याला नोकरी मिळणार होती. परंतु अनुकंपच्या जागा अद्यापही निघाल्या नाही. तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून जतींदरसिंग हा वेकोळीच्या वासहतीतच शासकीय निवासस्थान काबीज करून बसला आहे. वेकोळीचे अधिकारी शासकीय निवासस्थान खाली करून का घेत नाही. असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

इतकेच नाही तर सदर निवासस्थाने ही तर काही रिटायर्ड कर्मचाऱ्यांनी भाडे तत्वावरही दिली असल्याची माहिती आहे. अशा निवास स्थानात काय होते याची जाणीवही वेकोलीच्या अधिकाऱ्यांना नाही काय? यांच्यावर का कारवाई करण्यात येत नाही हे जनता अजूनही समजू शकली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.