एमआयडीसी परिसरात आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

आत्महत्या की हत्या ? चर्चेला उधाण...

0

विवेक तोटेवार, वणी; बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणीतील एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीजवळ एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. सदर युवकाचे नाव कार्तिक अशोक कोमरेड्डीवर (16) असून तो 10विचा विद्यार्थी आहे.

अशोक रामन्ना कोमरेड्डीवार यांना तीन मुले आहेत. त्यापैकी कार्तिक हा मोठा मुलगा नुकताच 9 वीची परीक्षा पास करून 10 वीचे शिकवणी वर्ग करीत होता. तो दररोज प्रमाणे सकाळी 7 वाजता शिकवणी वर्गाकरिता आपल्या दुचाकी वाहनाने घरून निघाला. दुपारी 1 वाजताच्या सुमारास कार्तिकाची मोठी आई दुर्गाबाई हीचा कार्तिकच्या वडिलांना फोन आला. तिने सांगितले की, कार्तिकाची मोबाईलवर फोन केला असता फोन दुसऱ्यानेच उचलला व कार्तिक एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकीजवळ पडून असल्याचे सांगितले.

कार्तिकच्या वडीलांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी कार्तिक पडून होता त्याच्या हाताला व पाठीला इजा झाल्या होत्या. वडिलांनी त्याला दुपारी 1.30 च्या दरम्यान वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे. हा खून आहे की आत्महत्या अजूनही कळू शकले नाही. कार्तिकच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.