मेंढोलीच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

0 470

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील मेंढोली ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था द्वारा शेतकऱ्यांना हंगाम २०१९- २० च्या पीक कर्जाचे वाटप सोमवारला करण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखे मार्फत १५७ सभासद शेतकऱ्यांना १ कोटी ५१ लाख १५ हजार ९०० रुपयांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी बँक व्यवस्थापक आर. व्ही. पिट्टलवार, निरीक्षक बी. यू. बोबडे, रोखपाल ताई पुनवटकर, लिपिक एन.आर. ठावरी, एस. व्ही. सुरपाम, सहकारी संस्था अध्यक्ष पंढरीनाथ एकरे, सचिव प्रभाकर डोहे, सदस्य प्रवीण एकरे, सूर्यभान कुचनकार, अनिल भोयर आणि शेतकरी उपस्थित होते. हंगामापूर्वीच कर्ज प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.   

Comments
Loading...