भीम जयंती निमित्त आज वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन  

नगर वाचनालयात पुस्तक प्रदर्शनी, तर आंबेडकर चौकात पुस्तक दान

बहुगुणी डेस्क, वणी: भीम जयंती निमित्त वणीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बाबासाहेब यांच्या जीवनावरील या वाचनालयात उपलब्ध पुस्तकांची प्रदर्शनी घेण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन येथील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथावर वर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनींनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी नगर वाचनालयात आयोजित या ग्रंथ प्रदर्शनीच्या अभिनव उपक्रमाला भेट देण्यासाठी येण्याचे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Podar School 2025

पुस्तक भेट देऊन अभिवादन
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त द ग्रेट पीपल्स ग्रुप वणीच्या वतीने १४ एप्रिलला सकाळी ७ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक आगळीवेगळी अभिवादनाची संकल्पना राबविण्यात येत आहे. पारंपरिक पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करण्याऐवजी पुस्तके भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारी 12 वाजता बस स्थानकाजवळ धम्मभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर संध्याकाळी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.