आनंदाची बातमी – बालविद्या मंदिर शाळेत आता पहिलीपासून CBSE पॅटर्न, प्रवेश सुरु…

आता मोफत घेता येईल सेमी इंग्रजी माध्यमातून सीबीएसई पॅटर्नने शिक्षण

बहुगुणी डेस्क, वणी: शासनाने राज्यातील सरकारी व अनुदानित मराठी शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) पॅटर्न राबवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आता आनंद नगर येथील बालविद्या मंदिर शाळेत या वर्षांपासून सीबीएसई पॅटर्न सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वर्ग 1 ते वर्ग 4 साठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी (सीबीएसई) प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे एकीकडे सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी हजारो रुपये फिस आकारली जात असताना, बालविद्या मंदिर येथे विद्यार्थांना मोफत प्रवेश दिला जात आहे. यासह मोफत पाठ्यपुस्तके देखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. अवघ्या मोजक्या जागा शिल्लक असल्याने पालकांनी तात्काळ संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केला आहे. अधिक माहितीसाठी पालकांनी शाळेच्या कार्यालयात भेट द्यावी किंवा 9420046497 (तिरणकर सर) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये सीबीएसई पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्यानुसार बालविद्या मंदिर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पालकांना आनंद नगर येथील शाळा कार्यालयात स. 8 ते स. 11 या वेळेत संपर्क साधावा लागणार आहे. पाल्याचे जन्म प्रमाणपत्र व आधार कार्डची फोटोकॉपी (झेरॉक्स) हे अवघे दोन कागदपत्र देऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रवेश मोफत असून पाल्यांना कोणतीही फीस किंवा छुपी फिस आकारली जाणार नाही. मोफत पाठ्यपुस्तकेही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. तसेच मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

  • बालविद्या मंदिर शाळेची वैशिष्ट्ये –
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लवकरच CBSC अभ्यासक्रम सुरू
  • सेमी इंग्रजी माध्यम, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद
  • उत्कृष्ट व दर्जेदार संस्कार युक्त शिक्षण
  • महाराष्ट्र शासन पुरस्कृत मोफत पाठ्यपुस्तक सुविधा
  • खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, मध्यान्ह भोजन व्यवस्थाशाळेच्या नियमित तासिका व अतिरिक्त वैयक्तिक मार्गदर्शन

बालविद्या मंदिर एक प्रतिष्ठीत शाळा
बालविद्या मंदिर ही वणीतील एक जुनी व सुपरिचित शाळा आहे. उत्कृष्ट, दर्जेदार व संस्कारयुक्त शिक्षण देण्यासाठी या शाळेची अनेक दशकांपासून ओळख आहे. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत. अनेक लोक परदेशी नोकरी करीत आहे. तर अनेक लोक विविध क्षेत्रात आपले नाव कमवीत आहेत.  त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, – शाळा व्यवस्थापन

अधिक माहितीसाठी संपर्क – बालविद्या मंदिर, आनंद नगर, वणी
मो. ताठे सर (मुख्याध्यापक) – 7517091367, तिरणकर सर – 9420046497, कोल्हे सर – 7448078896, गाताडे सर – 8830864815, राठोड सर – 7020145543, मोहितकर सर 7875436623
वेळ – स. 8 ते स. 11 पर्यंत

Comments are closed.