वणीत दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबेना, पुन्हा दुचाकीची चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणीत दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. सोमवारी वणीतील लालगुडा येथून एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण नथ्थूजी गोवारदिपे (32) हे लालगुडा येथील रहिवासी आहे. ते मजुरी करतात. त्यांनी गेल्या वर्षी हिरो कंपनीची सिल्वर रंगाची स्प्लेंडर प्लस ही दुचाकी (MH29 BX4946) विकत घेतली होती. सोमवारी दिनांक 15 मे रोजी रात्री नेहमी प्रमाणे त्यांनी आपली दुचाकी घराच्या समोरील टिनाच्या शेडमध्ये हॅन्डल लॉक करून ठेवली.

मंगळवारी सकाळी 6 वाजता नारायण यांनी बघितले असता शेडमध्ये त्यांना दुचाकी आढळली नाही. अवघ्या एक वर्षांआधी विकत घेतलेली दुचाकी चोरीला गेल्याने त्यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शहरात दुचाकी चोरट्यांचा उच्छाद
दुचाकी चोरी आता नित्याचीच बाब झाली आहे. कधी दिवसाढवळ्या तर रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी लंपास करीत आहे. सातत्याने या घटना होऊनही अद्यापही दुचाकी चोरट्यांचा सुगावा वणी पोलिसांना लागलेला नाही. दुचाकी चोरीला गेलेल्यात गरीब आणि निम्न मध्यवर्गीय वर्गांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे त्यांचे चांगलेच नुकसान होत आहे तर अद्यापही दुचाकी चोरट्यांचा कोणताही सुगावा लागत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.

हे देखील वाचा: 

दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, जंगली पीर जवळ मध्यरात्री थरार

गांजा ओढताना तीन तरुणांना अटक, वणी पोलिसांचे गर्दुल्यांवर धाडसत्र

Comments are closed.