बहुगुणी डेस्क: बिग बॉस’चं मराठमोळं रूप महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि ते लोकांच्या पसंतीसही उतरलं. किमान एकदा तरी ‘बिग बॉस’च्या घरात जायला मिळावं अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. ‘बिग बॉस’च्या खऱ्याखुऱ्या घराला भेट देणं शक्य नसल्यानं आता चक्क हे घरच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे घर शनिवारी वणीमध्ये दाखल होत आहे. एका मोठ्या बसमध्ये बिग बॉसच्या घराचे प्रतिरूप बनवण्यात आलं असून वणीकरांना सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक कॉलेजसमोर व दुपारी 2 वा. पोलीस स्टेशन मागील परिसरात बघता येणार आहे. सोबतच प्रेक्षकांसाठी विविध गेमचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
बिग बॉसच्या घरातील मुलींची बेडरूम त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूमजवळील कोल्हापुरी चपला, घरात आल्यावर असलेलं तुळशी वृंदावन, पैठणीच्या कापडानं बनवलेली उश्यांची कव्हर हे सगळंच लक्ष वेधून घेणारं आहे. बिग बॉसचं हेच सुंदर घर एका बसमध्ये तयार करण्यात आलंय.
ज्यात घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रूम हुबेहूब तयार करण्यात आलाय. विशेष म्हणजे घरातील सदस्य ज्या कन्फेशन रूममधून बिग बॉसशी संवाद साधतात, ती कन्फेशन रूमदेखील प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आली आहे.
त्यामुळं, या बसच्या माध्यमातून प्रेक्षकांना बिग बॉसच्या घराची सफर केल्यासारखं नक्कीच वाटू शकतं. ही बस सध्या महाराष्ट्राचा दौरै करीत आहे.