मुकूटबन येथील बहुतांश बियरबारमधील दारू साठयात मोठी तफावत
लॉकडाऊनमध्ये बारमधील साठ्याची अवैद्यरित्या विक्री केल्याचे उघड
सुशील ओझा, झरी: शासनाने देशी दारू दुकान व वाईन शॉपला सशर्थ परवानगी दिल्यानंतर असता बियरबारला सुद्धा सशर्थ परवानगी २२ मे पासून देण्यात आली आहे. बियरबार चालकाला लॉकडाऊन पुर्वी दुकान बंद करण्यात आले होते. त्यातील शिल्लक असलेला साठा प्रिंट रेट नुसार विकण्याची परवानगी देण्यात आले आहे. बियरबार उघडण्याची दिनांक २२ मे होती परंतु मुकूटबन येथील एकाच बार मालकाने बार उघडले. इतर एकही बार न उघडल्याने शंका व्यक्त केल्यात जात होते. लॉकडाऊन मध्ये जास्त दराने अवैद्यरित्या बार मधील दारू व बियर विक्रीची चर्चा गावात मोठ्या प्रमाणात सुरू होती. बियरबारच्या मागील गेटने दारू व बियरची विक्री मोठ्या प्रमाणात केल्याने दारू व बियरच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळणार याबाबतचे भाकीत ‘वणी बहुगुणी’ने सर्वात आधी केले होते.
२३ मे रोजी अबकारी विभागाचे निरीक्षक भटकर यांनी झरी व मुकूटबन येथील बियरबार ला भेट देऊन (स्टॉक) साठा तपासणी केली असता बहुतांश बियरबार मधल्या साठ्यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. तर अनेक बारमध्ये विक्री करिता दारूच्या बॉटल सुद्धा नसल्याची माहिती आहे. ज्यामुळे बियरबार चालकांचे दाबे दणाणले असून साठा कमी आढळल्याने बियरबरचा परवाना रद्द होणार याची भीती बारचालकांमध्ये निर्माण झाली आहे.
अबकारी विभागाचे दुय्यम निरीक्षक भटकर हे आपल्या सहकाऱ्यांसह मुकूटबन येथे रात्री उशिरापर्यंत बारची तपासणी केली. तपासणी बाबत विचारणा केली असता बहुतांश बारच्या साठ्यात मोठी तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे मुकूटबन येथील ४ ते ५ बियरबारचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. शासनाने शिल्लक साठा असलेल्या बारमधील दारूची विक्री प्रिंट रेट मध्ये विकण्याचे आदेश असताना १७० रुपयांची शिशी २४० तर बियरसुद्धा २४० रुपये घेऊन जास्त दराने विक्री करीत आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त सर्वच दुकाने बियरबार देशी दारूची दुकाने व वाईनशॉप बंद करण्यात आले. ज्यामुळे मद्यपी लोकांचे मोठे हाल झाले. अवैद्य दारू विक्री करणाऱ्या कडून 52 रुपयांचा पवा १५० ते २०० रुपये प्रमाणे विकत घ्यावे लागले तर २०० रुपयांची इंग्लिश दारूची शिशी ३५० ते ४०० रुपये प्रमाणे विक्री करण्यात आली.
अवैध दारू विक्रेत्यांचा साठा संपल्यानंतर मुकूटबन व झरी येथील बहुतांश बियरबार मधून खुलेआम इंग्लिश दारू व बियरची विक्री संबंधीत विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष केल्या जात होते. लॉकडाऊनमध्ये अबकारी विभागाकडून तालुक्यातील सर्वच बियरबार व देशी दारू दुकानाला सील लावण्यात आले होते. सील लावण्यापूर्वी अबकारी विभागाला शिल्लक असलेल्या दारू साठा व विक्रीची माहिती घेऊन सील लावावे लागते. लॉकडाऊनमध्ये शिल्लक साठ्यातूनच दीड महिना खुलेआम देशी व इंग्लिश दारूची विक्री तालुक्यात विक्री सुरू होती.
अबकारी विभाकडून बियरबार व देशी दारूच्या दुकानाला समोरच्या गेटला सील लावण्यात आले होते तर मागचे गेट खुले होते. ज्यामुळे मागील गेटने दारूचे बंपर शिष्या तसेच थंडी बियर सुद्धा घरपोच विक्री केली जात होती. दुकानाला सील लावल्यानंतर दारू दुकानदार दारूच्या शिष्या काढून कशी विक्री केली जाते असा प्रश्न उवस्थित होत होता.
लॉकडाऊन जनतेला घराच्या बाहेर निघण्याकरिता बंदी होती परंतु मुकूटबन ते पाटण व वणी मार्गावरील दोन्ही पेट्रोल पंपापर्यत सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत दारू करिता रांगा पहायला मिळत होत्या. बारचालकांच्या जवळील व दररोज बारमध्ये बसून पिणाऱ्या ग्राहकाला घरपोच दारूच्या बंपर शिष्या व बियर पोहचविल्या जात होत्या.
मुकूटबन व झरी येथील बियरबार मधील साठा चेक केल्यास अनेक बार व देशी दारू दुकानाचे परवाने रद्द होणार व अबकारी विभागाचे व दुकानदारांची मिलीभगत उघड होणार याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वेळीवेळी पाठपुरावा केला होता हे विशेष.