अबब… ! चिंचमंडळ येथे आढळला 28 किलोचा महाकाय मासा

मासा खरेदी करण्यासाठी चक्क चंद्रपूरहून आले खवय्ये

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ येथील वर्धा नदीच्या घाटावर अवाढव्य मासा एका मासेमा-याला आढळून आला. या माशाचे वजन तब्बल 28 किलो होते. याशिवाय यासोबतच त्यांना आणखी एक चार किलोचा मासा आढळून आला. सदर मासा खिरट जातीचा असून तो खरेदी करण्यासाठी चक्क चंद्रपूरहून देखील ग्राहक आले होते.

चिंचमंडळ येथील एक मासेमार होळीच्या दिवशी वर्धा नदीच्या घाटावर गेले असता त्यांचे त्या दिवशी चांगलंच भाग्य उजळलं. त्यांच्या जाळ्यात 5 नाही 10 नाही तर तब्बल 28 किलोचा मासा अडकला. महाकाय मासा पकडल्याची माहिती लगेच परिसरातील पट्टीच्या खवय्यांच्या कानावर व्हॉट्सऍपवरू पोहोचली.

धुळवडीला हा मासा खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या मासेमारानी या माशाची घरूनच विक्री केली. खवय्यानी प्रतिकिलो 1 हजार ते 1200 रुपये मोजले. अवघ्या काही वेळातच या माशाची विक्री झाली. हा मासा खरेदी करण्यासाठी मारेगाव, वणी, वरोरा यासह चक्क चंद्रपूरहून देखील खवय्ये आले होते. या माशामुळे त्यांच्या धुळवडीत आणखीनच रंग भरले गेले. 

हे देखील वाचा:

अजय कंडेवार यांची IHRAO च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.