चोर आला गुपचूप काय गेला करून, बाईकच पळवली एकाच्या घरून

सर्वोदय चौकातून रातोरात बाईक लंपास, बाईक चोरीचं सत्र सुरूच

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरीच्या घटना थांबता थांबत नाही. त्यात बुधवारी रात्रीनंतर पुन्हा एक बाईक सर्वोदय चौकातून लंपास झाली. त्यामुळे एका शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला. एवढी सुरक्षित ठेवलेली बाईक कशी चोरीला गेली, याचंच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. ही घटना बुधवार दिनांक 14 मे च्या रात्री 9 ते गुरुवार दिनांक 15 मे च्या सकाळी 06 वाजण्याच्या दरम्यान घडली.

तक्रारीवरून संतोष किसन काकडे (49) हे शेतकरी स्थानिक सर्वोदय चौकात राहतात. त्यांच्याकडे नित्य वापरासाठी त्यांची अंदाजे 40 हजार र काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल (MH 29 BZ 4495) होती. नेहमीप्रमाणेच बुधवार दिनांक14 मे रोजी रात्री 9च्या दरम्यान त्यांनी गाडी आपल्या घरी लावली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 15 मे च्या सकाळी 6 वाजता त्यांना गाडी दिसलीच नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. विचारपूस केली. पण हे सगळं व्यर्थ ठरलं. रात्रीतूनच अज्ञात चोरट्यानं त्यांची बाईक पळवली होती.

अखेर गाडी न सापडल्याने संतोष किसन काकडे यांनी शुक्रवार दिनांक 16 मे रोजी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पो.उप.नि. धीरज गुल्हाने करीत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.