विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावचा पाहुणा वणीत आला. दीपक चौपाटीजवळ गाडी लावून कामासाठी गेला. मात्र परत आल्यावर त्याची दुचाकी लंपास झालेली आढळली. तर दुसरी घटना ही टिळक चौकात घडली. यातील एक घटना ही 9 जुलै तर दुसरी घटना ही 10 जुलै रोजी घडली. सततच्या दुचाकी चोरीमुळे वणीकर त्रस्त झाले आहे.
पहिली घटना, धनंजय किसन गोवारदीपे (33) रा. आनंदनगर वणी हे येथे राहत असून ते दुकान चालवितात. बुधवारी सायंकाळी 7 वाजता हे आपली दुचाकी टिळक चौकातील एका पान टपरीवर ठेवली व ते कामानिमित्त बाहेर गेले. अर्ध्या तासाने 7.30 वाजता परत येऊन बघितले असता दुचाकी दिसून आली नाही. दोन दिवस दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली.
दुसरी घटना ही दीपक चौपाटी जवळ घडली. शुभम सुभाष मंडवदरे हा सुकडी ता. बाभुळगाव येथील रहिवासी आहे. तो मजुरी करतो. त्याच्याकडे स्प्लेंडर ही दुचाकी आहे. मंगळवारी सकाळी तो काही कामानिमित्त वणी येथे आला होता. दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याने दीपक टॉकीज चौपाटी जवळ हँडल लॉक करून दुचाकी ठेवली. मात्र दीड तासाने तो परत आल्यावर त्याला दुचाकी आढळून आली नाही. अखेर त्याने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) नुसार गुन्ह नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोउनि बलराम झाडोकर करीत आहे.
Comments are closed.