सतर्क रहा, गाडी व्यवस्थित लॉक केलीये? चोरट्यांचा धुमाकूळ

कदाचित चोरांच्या नजरेत तुमची ही गाडी असेल

 

Podar School 2025

विवेक तोटेवार, वणी: रात्री झोपण्यापूर्वी गाडीचं आणि गेट्सचं लॉक नक्की चेक कराल. कारण बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी रात्री सुमारे आठ-नऊच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एक बाईक पळवली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार वणी पोलिसात अज्ञाताविरुधात तक्रार दाखल झाली आहे. इंदिरा चौकातून ही बाईक अचानक गायब झाली. या मागचं गोडबंगाल अजूनही कुणाला कळलं नाही. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी शहरात नवे ठाणेदार रुजू झालेत. बाईक चोरींच्या अशा घटनांमुळे वणी पोलिसांपुढे नवे आव्हान उभे झाले आहे. शहरातील इंदिरा चौक येथील रहिवासी राहुल संजय दबडे (22) याची बाईक इंदिरा चौकातून लंपास झाली. गाडीचा नंबर MH- 29 BN 98 02.

फिर्यादी हे अत्यंत सामान्य परिस्थितीतले आहेत‌. त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. या दरम्यान त्यांनी गाडी कोणाकडे तरी पार्क केली. नेमकी ती तिथूनच रहस्यमवरीता गायब झाल्यामुळे संशय उद्भवला आहे. बघूया पुढे काय होतं.

Comments are closed.