बहुगुणी डेस्क, वणी: सर्वत्र चर्चा असलेला सिनेमा पाहण्याचा त्याचा मूड झाला. तो वणीतील एका टॉकीजला आला. आपली गाडी टॉकीजसमोरच लावली. सिनेमाचा आनंद घेतल्यावर तो बाहेर आला.पाहतो तर काय त्याची बाईक गायब. त्याने काही वेळ शोधाशोध केली. विचारपूस, चौकशी केली. मात्र काहीच हाती लागलं नाही.
ही घटना 22 फेब्रुवारीला सायंकाळी 4.00 ते 5.30च्या दरम्यान घडली. तरीही त्यांनी गाडीचा मागोवा घेण्याचा काही दिवस प्रयत्न केला. अखेर त्याच्या वडलांनी सोमवार दिनांक ३ मार्चला वणी पोलीस स्टेशन गाठलं. वांजरी येथील शेतकरी पुरुषोत्तम रामचन्द्र तेलतुंबडे (63) यांनी पोलिंसांना सर्व हकिकत सांगितली.
फिर्यादीचा मुलगा हा पॅशन प्रो कंपनीची गाडी क्र.MH 29 AU 2542 घेऊन सिनेमा पाहायला गेला होता. त्याची गाडी काळ्यारंगाची सिल्वर पट्टा असलेली अंदाजे 30,000 रूपये किमतीची होती. ती अज्ञात चोरट्याने टॉकीजसमोरून चोरून नेली.फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉं. मारोती पाटील करत आहेत.
Comments are closed.