महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे पाटण येथे रास्तारोको

ओबीसी आरक्षण रद्द करण्याविरोधात जोरदार नारेबाजी करत केला चक्काजाम

0

सुशील ओझा, झरी: राज्य सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा आरोप करत झरी तालुका भाजपतर्फे पाटण येथील चौकात वणी ते आदीलाबाद राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तथा भाजप तालुका अध्यक्ष सतीश नाकले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आहे.

इम्पेरीकल डाटा राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला नसल्याने मागासवर्ग आयोग गठीत न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ५२% ओबीसी चे आरक्षण रद्द केल्याने भाजपने आक्रमक धोरण अवलंबले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पाटण येथील बसस्थानकजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तालुका अध्यक्ष सतीश नाकले यांनी ओबीसी आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणा पणामुळे रद्द करण्यात आल्याचा आरोप करत ओबीसींना न्याय देण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार, संगीता मानकर. स सभापती राजेश्वर गोंड्रावार, उपसभापती लता आत्राम, अशोकरेड्डी बोदकुरवार, मुन्ना बोलेनवार, राम आईटवार, प्रवीण नोमुलवार, सतीश दासरवार, श्याम बोदकुरवार, संजय दातारकर, अरुण हिवरकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.