शिवजयंती निमित्त अडेगाव व बाळापूर येथे रक्तदान शिबिर

30 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील बाळापूर( बोपापुर) येथे 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवभक्त मंडळ बाळापूर व शासकीय रक्तपेढी व चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तर अ़डेगाव येथे शुक्रवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

बाळापूर वेळेअभावी अनेक रक्तदात्याने परत जावे लागले ज्यामुळे रक्तदात्यांची हिरमोड झाली. बाळापूर येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त रक्तदानाचा कार्यक्रम घेतला जातो. शिबिरात परिसरातील दरा, साखरा, पिलकी वाढोना व बोपापुर येथील रक्तदाते रक्तदानाकरिता मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

अडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त्याने छत्रपती शिवराय क्रीडा मंडळ अडेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर या शिबिराचे उद्घाटन नितेश ठाकरे (शिवजन्मोत्सव आयोजन समिती अध्यक्ष), देव येवले (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष ), प्रशांत बोबडे (मार्गदर्शक), संदीप आसुटकार (संचालक-जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट) यांचे उपस्थितीत पार पडला. तर या वेळी नागपूर लाईफ लाईन ब्लड तर्फे छत्रपती शिवराय क्रीडा मंडळ अध्यक्ष आशिष झाडे यांचा सत्कार करून या रक्तदान शिबिराची सांगता करण्यात आली.

हे देखील वाचा:

छत्रपती महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सत्कार

परदेशी मॉडेलसारखी सजवली जाते कॉलगर्ल (भाग 6)

Leave A Reply

Your email address will not be published.