देव येवले, मुकुटबन: पुरड(नेरड) येथे बुधवारी दिनांक 30 ऑगस्टला वीर शहीद विकास ज. कुळमेथे यांच्या स्मृतीस रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पुरड येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालयात सकाळी 10 ते सायं. 5 च्या दरम्यान हे शिबिर संपन्न झाले. यामध्ये गावातील व परिसरातील 75 युवकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उमेश परेकर (उपसरपंच), मार्गदर्शक सागर इंगोले (ठाणेदार, शिरपुर पो.स्टेशन) तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण भगत, नंदकिशोर खारकर, मोहीतकर, शाम बोढे, झिगुंजी पिंपळशेंडे, डॉ. राच्लावार, डॉ.शेंडे यांची उपस्थिती होती.
हे शिबिर नवयुवक गणेश मंडळ व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या रक्तदात्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिरपूर पो.स्टेशनचे ठाणेदार सागर इंगोले यांनी उपस्थितांना रक्तदान व अवयवदानचे महत्व पटवून दिले.
रक्त संकलित करण्याचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या टीमने केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वसंता थेटे, प्रतिक थेरे, राहुल ताजने, पराग लोणगाडगे, अतुल ढेगळे, प्रसेनजीत खैरे , डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालय , नवयुवक गणेश मंडळ व पुरड(नेरड) येथील युवकांनी परिश्रम घेतले.