वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन
विवेक तोटेवार, वणी: 15 डिसेंबर रोजी वणीतील कमान चौकात राजपुताना हॉटेल समोर वर्धमान फाऊंडेशन व निस्वार्थ सेवा ग्रुप द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान समजल्या जाते. याअगोदरही निस्वार्थ सेवा ग्रुप अनेक सामाजिक कार्य करीत आहे. यात ब्लॅंकेट वाटप असो की कुणाल रक्ताची आवशकता असो या ग्रुप मधील सर्व मेम्बर नेहमीच धावून येतात. यावेळी मात्र वर्धमान फाऊंडेशन व निस्वार्थ सेवा ग्रुप यांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे ठरविले.
याकरिता चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय व महाविद्यालय येथील रक्तपेटीला पाचारण केले. वणी येथील रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा वेळीच रक्त न मिळाल्याने कोणताही रुग्ण दगावू नये याकरीत हा नवीन उपक्रम घेत असल्याचे संघटनेच्या सदस्यद्वारा सांगण्यात आले.
या ठिकाणी वणीकरांनी उस्फुर्त सहभाग घेत शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. निस्वार्थ सेवा गुप द्वारे असे आवाहन करण्यात आले की, कुणालाही रक्ताची आवशकता असल्यास त्यांनी ग्रुपच्या सदस्यांना फोन करा त्वरित रक्त उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
यावेळी वर्धमान फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सफल केला म्हणून रक्तदात्याचे आभार मानले. त्याचप्रमाणे मानवसेवा हीच ईश्वरसेवा हाच मानवता धर्म असल्याचे उदगार यावेळी चोरडिया यांनी काढले.