पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची जाणीव जागृत करून समाजसेवेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि योगा मेडिटेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. मानस कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
या शिबिरात महाविद्यालयाच्या 49 आजी-माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. व्यासपीठावर औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य सुधाकर रेड्डी, जी.एम.सी. चंद्रपूरचे डॉ. अनिल मुजगेवार, डॉ. ललित घोगरे, तसेच डॉ. अभिजित अणे, प्रा. प्रफुल्ल कोसे, डॉ. आदित्य शेंडे, प्रा. उमेश व्यास आणि प्रा. किसन घोगरे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. डॉ. अनिल मुजगेवार यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना यासंदर्भातील गैरसमज दूर केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. मानस कुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या दातृत्वाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

रक्तसंग्रहासाठी जयसिंग डोंगरे, योगिता माळी, सौ. सोनी, गायत्री, सुनील चंदनखेडे, अपेक्षा शिंगाडे, साहिल उखारे आणि चेतन यांच्या वैद्यकीय चमूने सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जुनगरी यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले. शिबिराला गणेश आसुटकर, नितीन शिंदे आणि संजय बिलोरिया यांचे विशेष सहकार्य लाभले.



Comments are closed.