क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्माईल फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त स्माईल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर व अनाथ, दिव्यांग, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शहरातील कल्याण मंडपम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर 80 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

छ. शिवाजी महाराज व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. कॉ. नामदेवराव काळे यांच्या प्रतिमेला मान्यवरांतर्फे हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभम हनमंते होते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश बोबडे, सूरज मडावी, जिल्हा शोध व बचाव पथकाचे किशोर भगत, समाजसेवा अधिक्षक प्रीती घटारे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

दुपारी 3 नंतर स्व.मनोज लक्ष्मणराव हिवरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनाथ, दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्माईल फाउंडेशन अध्यक्ष सागर जाधव यांनी केले. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शहरात असे कार्यक्रम नेहमी होणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण दिकुंडवार यांनी मनोगत व्यक्त करताना अशा कार्यक्रमाला कायम मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी लक्ष्मीकांत हेड़ाऊ, आशिष ढवळे, विजय कडूकर, सचिन मुसळे, शशिकांत, श्रीकांत गारघाटे, राहुल खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, गौरव कोरडे, दिनेश झट्टे, कुणाल आत्राम, कार्तिक पिदूरकर, सचिन काळे, रोहित ओझा, तुषार वैद्य, युग, सचिन भोयर यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.