विवेक पिदूरकर, शिरपूर: धनोजे कुणबी समाज विकास या सामाजिक संस्थेने रविवार दिनांक 04.10.20 रोजी रक्तदान शिबिर घेतले आहे. चिखलगाव परिसरातील साधनकरवाडी येथील धनोजे कुणबी समाज भवन येथे हे रक्तदान शिबिर होईल. हे शिबिर सकाळी 11 ते 4 या वेळेत होईल.
कोरोनाच्या काळात रक्तदानाचं खूप महत्त्व आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांना लाभ होतो. रक्तातील विविध घटकांची अनेक रुग्णांना गरज असते. नियमित आणि सर्वत्र रक्तदान शिबिर व्हावेत. असंही आयोजकांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या या काळात रक्ताची मागणी जास्त आहे. ती गरज लक्षात घेता समाजातील युवकांनी हे आयोजन केलं. देशातील या संकटकाळात शक्य असेल त्यांनी रक्तदान करावेच ही विनंती आयोजकांनी केली. संस्थेचे विकास जेनेकर, प्रदीप बोरकुटे, सचिन पिंपळकर, सचिन ढोके, मंगेश रासेकर, प्रवीण भोयर यांनी केले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)