गांधी जयंतीनिमित्त झरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

झरी तालुका संभाजी ब्रिगेडचा उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाइफलाइन ब्लड बँकच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय झरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. झरी तालुका हा आदिवासी बहुल व मागास तालुका आहे. ग्रामीण भागातील लोकांना रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी व त्याचे महत्त्व कळावे याच हेतूने दर वर्षी प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेडाम पाटण पोलिस स्टेशनच्या ठाणेदार संगिता हेलोंडे, डॉ. विरखडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष समिर लेनगुळे, मराठा सेवासंघ तालुकाध्यक्ष केतन ठाकरे, निलेश येल्टीवार ,दत्ता डोहे, नितेश ठाकरे, संदिप आसुटकर, वैभव मोहितकार, कुणाल पानेरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते, या रक्तदान शिबिरामध्ये ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.