देवाळा येथे रक्तदान शिबिर संपन्न

गांधी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

भास्कर राऊत, मारेगाव: शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ देवाळा व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबरला गांधी जयंती चे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 26 तरुणांनी रक्तदान केले.

सध्या सगळीकडे रक्ताचा तुटवडा जाणवत आहेत. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांमार्फत रक्तदान शिबीर आयोजन करीत असतात. याच सर्व गोष्टींचा आदर्श समोर ठेऊन मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील युवकांनी गणपती उत्सवामध्ये इतर कार्यक्रम न करता रक्तदान शिबीर आयोजित करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला.

Podar School

या रक्तदान शिबिरात 26 युवकांनी रक्तदान केले. यावेळी देवाळा येथील सुमित जुनगरी, पितांबर देवाळकर, ऋतिक निमकर, संदीप बोकडे, अमित सावरकर, नितीन निखाडे, आकाश मत्ते,राहुल गानफाडे, अतुल गांजरे, संजय देवाळकर, महेश बुरडकर, सचिन बोकडे, मारोती निखाडे, प्रफुल देऊळकर, सुरज मत्ते, गजानन मत्ते, उमेश निखाडे, उज्वल बोधे, मारोती बोकडे, अमित देवाळकर, सुबोध गांजरे, दत्तात्रय खोके, अविनाश ढवस, कुणाल बोढे,सुभाष बोढे, कुणाल सोमलकर आदी युवकांनी रक्तदान केले.

लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर च्या वतीने सचिन दडवे, हरीश ठाकूर, वैभव बारहाते, विशाल घोडेस्वार, कोमल बारहाते यांनी 26 रक्तदात्यांचा रक्तपुरवठा संकलित केला. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता गणेश बुरडकर, आकाश गानफाडे, आशिष गानफाडे, प्रकाश बुरडकर, कार्तिक निखाडे, आकाश बोकडे, राकेश रोगे, धनंजय बोधाने, अजय गजबे, पवन बोढे, विवेक बोकडे, गणेश कोयचाडे, अजय निखाडे व समस्त देवाळा वासीयांचे सहकार्य लाभले.

हे देखील वाचा:

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले पळवून

क्रिकेटवर बेटिंग करताना नायगाव (खु) येथून एकाला अटक

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!