लाठी येथे रक्तदान करणा-या महिलांचा साडी देऊन सन्मान
रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांचे रक्तदान
जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता लक्षात घेता तालुक्यातील लाठी येथील युवा बाल गणेश मंडळातर्फे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत चालले. शासकीय रक्तपेढी चंद्रपूरच्या मदतीने हे शिबिर घेण्यात आले. यात 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनामुळे चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन लाठी येथील येथील गणेश मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. रक्तदान शिबिरात ज्या महिलांनी रक्तदान केले त्यांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
या शिबिरात संजीवनी खिरटकर, सुनीता डवरे, अश्विनी गोवारदिपे, राणी गोवारदिपे, राधा गोवारदिपे, मीनाक्षी उराडे, हर्षाली खोके या महिलांनी सहभाग घेतला.
धर्मा डोहे, रमेश खिरटकर, रितेश लाडे, धीरज भोयर, राहुल परचाके, प्रमोद खुरसाने, राकेश व-हाटे, मनोज आंबाडे, दीपक नरवडे, आशिष माहुरे, मंगेश मोते, सचिन खिरटकर, गणेश माहुरे, गणेश आंबडे, दीपक मोते, सचिन सातपुते, दिलीप खोके, संदीप राजूरकर, सुभाष मोते, आशिष खारकर, प्रेमा किटे, प्रफुल्ल उपरे, प्रवीण मोते, आशिष घोरुडे, विजय गोवारदिपे यांच्यासह 48 व्यक्तींनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी राहुल खारकर, प्रभाकर वाघाडे, प्रमोद खिरटकर, नीलेश करडे, ज्ञानेश्वर गोवरदिपे यांनी परिश्रम घेतले. तर लोकेश खोके, अजय गोवारदीपे, मुकेश खिरटकर, प्रकाश चार्लीकर, मंगेश खोके, निखिल तोडासे, कपिल खोके यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.
चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीचे संजय गावीत समाजसेवा अधिक्षक, जयसिंग डोंगरे, वर्षा सोनटक्के, अपर्णा रामटेके हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर लक्ष्मण नगराळे परिचर व सहायक रुपेश घुमे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.