बोरी (गदाजी) येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सततच्या आत्महत्येने तालुका हादरला

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आज बुधवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी बोरी (गदाजी) येथील एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली, सततच्या आत्महत्या हा तालुक्यातासाठी चिंतेचा विषय ठरत असून यामुळे परिसर हादरला आहे.

राहुल वसंता सोयाम (32) हा बोरी (गदाजी) येथील रहिवाशी होता. तो त्याच्या कुटुंबीयांसह राहायचा. राहुलने बुधवारी पहाटे 4 ते 5 वाजता दरम्यान घरचे सगळे झोपलेले असताना आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. वृत्त लिहेपर्णत आत्महत्या चे कारण कळू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, मृतकाचा प्रेताला शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रवाना केले.

मृतक राहुलच्या पच्छात त्याचे आई, वडील, भाऊ, तीन बहिणी व पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे. तालुक्यात होत असलेल्या आत्महत्येच्या घटना मुळे मात्र अवघा तालुका हादरला आहे. घटनेचा पुढील तपास पो.नि. जगदीश मंडलवार, पो.उप.नि. अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.