भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमराव भवानी आत्रास (65) या इसमाचे नाव असून तो गावातीलच रहिवाशी होता. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात हा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घात आहे की अपघात हे अद्याप कळू शकले नाही.
भीमराव भवानी आत्राम (65) हा 3-4 दिवसांपूर्वी बाहेरगावी जातो असे घरी सांगून निघाला होता. मात्र तेव्हापासून त्यांचा काहीही पत्ता नव्हता. अखेर रविवारी दिनांक 31 नोव्हेंबर रोजी भीमरावचा मृतदेह गावालगतच शासकीय जमीन गट क्र. 207 मधील एका खड्ड्यातील पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची वार्ता गावात पसरताच गावातील अनेकांनी मृतदेह पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती.
मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात भीमराव याचा मृतदेह आणण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. भीमराव यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.