अखेर बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

दोन दिवसांआधी तेली फैल इथून झाला होता बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: दोन दिवसांआधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आज सकाळी एका शेतात मृतदेह आढळून आला. मोरेश्वर गणपत देवाळकर (33) असे मृताचे नाव आहे. मोरेश्वर 10 ऑक्टोबर रोजी घरून निघून गेला होता.

Podar School 2025

मोरेश्वर गणपत देवाळकर हा तेली फैल येथील रहिवाशी होती. रविवारी दुपारी मोरेश्वर हा घरून निघून गेला होता. रात्री पर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज मंगळवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी विद्यानागरी जवळ असलेल्या पोटदुखे यांच्या शेतात पाणी साचलेल्या एका खड्यात मोरेश्वर याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद केली. बेपत्ता झालेला तरुण गतीमंद असल्याची माहिती आहे. तसेच मोरेश्वरच्या भावाचा देखील याच पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

सोनीच्या टीव्हीच्या EMI वर पहिली किश्त मोफत

सलून चालकावर दगडाने हल्ला, सावर्ला येथील घटना

Comments are closed.