नगर वाचनालयात मंगळवारी सकाळी ग्रंथ प्रदर्शनी

सकाळी 8.30 वाजता होणार उद्घाटन

0

बहुगुणी डेस्क, वणी: खासदार व आमदार यांच्या स्थानिक निधीतून खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन वणीतील नगरवाचनालयात मंगळवारी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. आधी ही वेळ संध्याकाळी 8 वाजता होती. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ही वेळ बदलवण्यात आली. तरी याची नोंद घ्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी असणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणून वणी नगरपालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे असणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावत ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.