जयप्रकाश वनकर, बोटोणी: आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या विकासासाठी स्वार्थासाठी धडपडताना दिसतो आहे. यातून हि काही व्यक्ती वेगळा सामाजिक ध्यास ठेऊन जगात असल्याचे प्रत्ययास येते. असाच एक प्रसंग बोटोणी येथे पाहायला मिळाला. बोटोनी येथे वास्तव्यास असलेले तोडसाम परिवार अगदी गुण्या गोविंदाने आपले जीवन जगत होते. काबडकष्ट करत हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. परंतु नियतीला कदाचित ते मान्य नसावं, अशाच काही घटना या परिवारासोबत घडत गेल्या. तोडसाम कुटुंबात एक मुलगा, दोन मुली व आई वडील असे व्यक्ती आहेत.
वामनराव यांनी दोन्ही मुलींचे लग्न करून दिले. घरातील सर्व व्यक्तींनी यासाठी दिवसरात्र मेहनत करून ही जवाबदारी पार पाडली. कुटुंब गाडा व्यवस्थित हाकला जात होता. त्यातच घरातील कर्ताधर्ता मुलगा सुहास तोडसाम याचा विवाह करून देण्यात आला. सारं काही हर्षउल्हासात पार पाडलं गेलं. मात्र लग्नाच्या काही दिवसा नंतरच सुहासला अर्धांग वायूचा झटका आला. नवरी मुलगी घर सोडून निघून गेली. मन हेलावून सोडणारी घटना घडली, कुटुंब संपूर्णपणे विस्कळीत झालं. पन्नाशी पार केलेले आई-वडील खचून गेले.
अशाही परीस्थितीत स्वतःला सावरत तोडासे कुटुंबियांचा मिळेल ते काम करून पुन्हा नव्या उमेदीने जन्गण्याचा संघर्ष सुरु झाला. काही हितचिंतकांनी शासकीय योजनेचा फायदा पन मिळूवून दिला. वडील आपल्या परीवारासठी मोल मजुरी करून घरात असलेल्या अपंग मुलाला सांभाळत जगण्याची धडपड सुरु होती. मात्र नियतीचा पुन्हा एकदा वार झाला. वामनराव तोडसाम यांना पन अर्धांग वायूचा झटका आला. कुटुंबप्रमुखाची ही अवस्था झाल्याने कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली.
मुलाला अर्धांगवायुचा झटका आल्याने वडीलांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली होती. मात्र आता वडीलांनाच काळाने निकामी केल्याने आता काय करायचे हा प्रश्न कुटुंबियांसमोर निर्माण झाला. दिवसेंदिवस परिस्थिती फार बिकट होत गेली. घरी एक माउली आणि घरातील दोन्ही कर्ते पुरुष खाटेवर खिळून होते. जगण्यासाठी कुठलाही मार्ग उरला नाही. घरात दोन्ही अर्धांग व्वायुने ग्रासलेले कर्ते पुरुष. न कोणता व्यवसाय न शेती. अशा परिस्थितीमध्ये जगावे कसे असा प्रश्न या कुटुबांपुढे निर्माण झाला.
तोडसाम परिवारासोबत झालेल्या सर्व घटना अनपेक्षित होत्या, या सर्व घटनाची माहिती गावातील होतकरू तरुण सुमित गेडाम यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांना दिली. त्यांनी प्रसंगाची दाहकता लक्षात घेऊन सदर कुटुंबाला भेट देण्याचे ठरवले आणि त्यांनी कुटुंबाला भेट दिली, राजूभाऊ ज्या प्रसंगी तोडसाम यांचे घरी आले. तेव्हा प्रसंग फार हेलावून सोडणारा होता. माय माउलीचे डोळे पाणावले होते. परिस्थिती पाहुन राजूभाऊ उंबरकर सुद्धा गहिवरले आणि त्यांना माय माउलीला लगेच पाच हजाराची मदत केली. याही पुढे मदतीचे हात सदैव पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी या कुटुंबिायंना दिला. मी तुमच्या मुलाप्रमाणे असून तुम्हाला लागणारी सर्वतोपरी मदत करेल अशी हमी दिली. यावेळी सतीश रोगे, श्रीकांत सामजवार (मनसे मारेगाव शहर अध्यक्ष) बोटोणी येथील सरपंचा मंजुषा मडावी, प्रवीण वनकर, उत्तम देवगडकर, पांडुरंग ढुमणे इत्यादि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.