बोटोणीवासियांची जलद बस थांब्याची मागणी 

0
जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी हे राज्यमहामार्गावरचं गाव असून इथली लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. सोबतच बोटोणीच्या आजूबाजूलाही बरीच गावं आहेत. करंजी आणि मारेगाव येथे भरणा-या आठवडी बाजारासाठी जाण्यासाठी इथून मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे बोटोणीतील रहिवाशांनी जलद बस थांब्याची मागणी केली आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी महामंडळानं ‘हात दाखवा गाडी थांबवा’ हे धोरण राबवलं, पण त्याचा फायदा प्रवाशांना होत नसल्याचं दिसत आहे. कोणत्याही जलद गाड्या बोटोणीमध्ये थांबत नाही. त्यामुळे वणी किंवा यवतमाळला जाणा-या प्रवाशांना करंजी किंवा मारेगावला जावं लागते. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

करंजी, मारेगाव, वणी या मोठ्या  बाजारपेठा असल्याने बोटोणी व परिसरातील लोकांना काही ना काही निमित्ताने तिथे जावे लागते. शिवाय वेळेत आपले काम आटोपून घरी परत यावं लागते. मात्र वेळेवर बस मिळत नसल्याने काम वेळेत होत नाही. त्या मुळे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष देऊन बोटोणीला जलद बसचा थांबा द्यावा अशी मागणी बोटोणीवासी करीत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.