होस्टेल मधून मुलगा बेपत्ता, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

15 दिवसांआधीच झाला होता वसतीगृहात प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांआधीच होस्टेलमध्ये ऍडमिशन झालेला मुलगा होस्टेलमधून बेपत्ता झाला. मारेगाव तालुक्यात रविवीर दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 दिवसांआधी मारेगाव तालुक्यातील एका गावातील होस्टेलमध्ये एक 9 वर्षांचा पार्थ (बदललेले नाव) दाखल करण्यात आले होते. रविवारी दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर होस्टेलमधले सर्व मुलं व गृहपाल हे टीव्ही पाहत होते. दरम्यान पार्थ हा रुमवर जाऊन आराम करतो असे सांगून टीव्ही पाहताना निघून गेला. काही वेळाने गृहपाल हे पार्थच्या रुममध्ये गेले असता त्याला तो तिथे दिसला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

होस्टेलमधल्या मुलांनी व गृहपालांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला. तसेच परिसरातील गावात विचारपूस केली. मात्र त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर गृहपालाने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीवर फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

Comments are closed.