ब्राह्मण सभा वणीची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी अरुण कावडकर तर सचिवपदी श्रीकांत उपाध्ये

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राह्मण सभा वणीच्या वतीने दि. 16 मे 2026 रोजी शनिवारी श्री जैताई देवस्थान येथील सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. सभा सेवानिवृत्त प्राध्यापक एकनाथराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सभेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर खोंड, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीप अलोणे तसेच किशोरराव साठे उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सेवानिवृत्त नायब तहसीलदार अरुण कावडकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी चंद्रशेखर खोंड, सचिवपदी श्रीकांत उपाध्ये, सहसचिवपदी प्रसाद चिडले, कोषाध्यक्षपदी मिलिंद आमलेकर तर संघटकपदी मनोज सरमोकदम यांची निवड करण्यात आली.

सभेच्या प्रारंभी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष चंद्रशेखर खोंड यांनी सर्वसंमतीने ब्राह्मण सभेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.  कार्यकारी सदस्य म्हणून श्रीवल्लभ सरमोकदम, आनंद शोभणे, संकेत भुलगांवकर, निखिल साठे, नितीन सराफ, जयंता लिडबिडे, अक्षय अणे, अनुराधा वैद्य आणि श्रृती उपाध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्धी प्रमुखपदी परितोष पानट, विधी सल्लागारपदी अॅड. आनंद जोशी तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून प्रा. डॉ. दिलीप अलोणे, प्रा. डॉ. स्वानंद पुंड आणि प्रा. डॉ. अभिजीत अणे यांची नियुक्ती करण्यात आली. सभेचे संचालन श्रीकांत उपाध्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद शोभणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल साठे, नितीन सराफ, नितीन शोभणे, मोहन नायगावकर आणि जयंत देशपांडे यांनी अथक परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.