वणीत आज अल्पसंख्याक अधिकार परिषदेचे आयोजन
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वणी विधानसभा क्षेत्र (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने सोमवार दि. 18 मे 2026 रोजी सायं. 5 वाजता वसंत जिनिंग हॉल, शेतकरी मंदिर जवळ, वणी येथे “अल्पसंख्याक अधिकार परिषद” आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव नसीम सिद्धीकी तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अफजल फारुक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या परिषदेत अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून समाजाच्या हक्क व अधिकारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच युवक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, जिल्हा वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, उपाध्यक्ष समीर बेग, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, अरविंद तुरणकर तसेच स्थानिक पदाधिकारी व युवक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


Comments are closed.