निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड

रस्त्यावर दुकान थाटून भाजी व फळविक्रीस बंदी

0

जब्बार चीनी, वणी:  रविवार दिनांक 9 मे पासून  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कोरोनासंदर्भातील नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. हे नियम रविवारी सकाळी 7 वाजेपासून लागू होणार असून 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे. नवीन नियमांमध्ये दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकान सुरू असल्यास दुकान मालकावर 50 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त भाजी व फळे रस्त्यावर थांबून विक्री कऱण्यास बंदी आणली आहे.

नवीन नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पुर्णतः बंदी राहील. सर्व किराणा दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन, मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा आहे. आठवडी बाजार, पारंपारीक भाजीबाजाराची ठिकाणे, रस्त्यावर थांबून भाजीपाला व फळे विक्री करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात येत आहे. तथापी सोसायटी, कॉलनी व गल्लीमध्ये जाऊन भाजीपाला, फळे विक्री करण्यास सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत मुभा राहिल,

कृषि सेवा केंद्रे, बि-बियाणे, खते, किटकनाशके विक्री केंद्रे सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष सुरु राहतील. अत्यावश्यक दुकानाव्यतीरिक्त इतर दुकाने सुरु असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतर नियमांचा भंग करुन उघडले असल्यास त्यांचेवर रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार) दंड आकारण्यात येईल व सदरील आस्थापना कोवीड-१९ च्या आजाराची अधीसुचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल व त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदयानूसार गुन्हा नोंद करण्यात येईल.

लग्न समारंभ घरगुती स्वरुपात २५ लोकांच्या उपस्थितीचे मर्यादेत पार पाडावेत, मंगल कार्यालये, सभागृहे, धार्मीक स्थळे इत्यादी ठिकाणी लग्न समारंभांना बंदी राहील. संबंधित तालुक्याचे तहसिलदार हयांचेकडून लग्नाची रितसर परवानगी घ्यावी लागेल. नियम व अटी शर्तीचा भंग केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल. ७. सर्व खाजगी, शासकीय/निमशासकीय कार्यालये बंद राहतील केवळ अत्यावश्यक सेवेची कार्यालये (उदा. महसूल, आरोग्य, नगर परिषद/नगर पंचायत, विद्युत, पाणी पुरवठा ग्रामपंचायती सुरु राहतील.) शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतांना बंदी राहील. अभ्यागत कार्यालयात आढळून आल्यास त्यांचेवर स्थानिक प्रशासना कडून रु.२००/- दंड आकारला जाईल.

निवेदने ई-मेल/व्हाटसअॅप/दुरध्वनीव्दारे घेण्यात येईल. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणा शिवाय विनाकारण घराबाहेर पडणा-या लोकांकडून पथकांव्दारे रु.२००/- दंड वसूल करण्यात येईल अश्या लोकांची पथकाकडून कोविड चाचणी करण्यात येईल. चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्यास त्यांची CCC मध्ये रवानगी करण्यात येईल व त्यासाठीचा होणारा खर्च त्यांचेकडून वसूल करण्यात येईल.

आदेशाबाबत गावपातळीवर जनजागृती करावी – तहसिलदार
ब्रेक द चैन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आजपासून भाजीबाजाराची पारंपरिक ठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेता ह्यांना दुकान थाटुन विक्री करता येणार नाही. त्याऐवजी ते वार्ड /प्रभागात ढकलगाडीवर किंवा ईतर साधनाचे आधारे भाजीपाला व फळे विक्रेते(सकाळी सात ते अकरा) विक्री करु शकणार आहेत. त्याबाबत जनजागृती, दवंडी, अनाऊंसमेंट नगरपालिका व ग्रांम पंचायत मार्फत करुन घ्यावी व त्याचे नियोजन करावे.
– तहसिलदार, वणी

हे देखील वाचा:

वणीतून कोरोना रुग्ण घेऊन जाणा-या ऍम्बुलन्सला रोहीची धडक

ऍम्बुलन्स चालकांकडून रुग्णांची लूट, दुप्पट ते तिप्पट वसुुली

Leave A Reply

Your email address will not be published.