शेतात इलेक्ट्रिक शॉक लागून बैलाचा मृत्यू

बोदाड येथील घटना, नुकसान भरपाईची मागणी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी शिवारातील बोदाड येथे एका बैलाचा इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू झाला. आज रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. शेतामध्ये डवरणी करित असताना ही दुर्दैवी घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार बोदाड येथील शेतकरी भगवान ढेंगळे हे शेतात डवरणी करित होते. दुपारच्या सुमारास विद्यत पोलच्या तंगाव्याला बैलाचा स्पर्श झाला. यात आधीच विजेचा प्रवाह होता. बैलाचा स्पर्श होताच बैलाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती शेतकऱ्यानी लगेच बाजुच्या शेतातील शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्याने मोबाईलवरून लगेच वीजवितरणच्या अधिकाऱ्याना घटनेची माहिती दिली. त्यानुसार तातडीने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व पशू संवर्धन विभागाचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले.

घटना स्थळावर बैलाचे शव विच्छेदन करण्यात आले. या वर्षीच ढेंगळे यांनी 1 लाख 60 हजार रुपयाची बैल जोडी घेतली होती. परन्तु या घटनेत एक बैल मरण पावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बैलांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.