जिल्हा परिषद कॉलोनीत घरफोडी, 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यांनी काढले पुन्हा डोके वर, 9 तोळे सोने व रोख रक्कमेची चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील नांदेपेरा रोडवरील गुरुवर्य कॉलोनी येथे घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी 9 तोळं सोनं व रोख रकमेसह सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांच्या अवकाशानंतर पुन्हा एकदा वणीत चोरटे ऍक्टिव्ह झाल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की गोपाळ बाळकृष्ण भुसारी हे वेकोलिमध्ये कार्यरत आहे. त्यांचे गुरुवर्य कॉलोनीत डॉ. खापने यांच्या दवाखाण्यासमोर घर आहे. गोपाळ हे नोकरीमुळे सुंदरनगर येथे राहतात तर त्यांची त्यांची वृद्ध आई कमलबाई (80) या वणीतील घरी राहतात. गोपाळ यांच्या घराचे रिनोव्हेशन सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या आई शेजारी राहत असलेल्या त्यांच्या मुलाकडे झोपायला जात होत्या. शुक्रवारी रात्री कमलबाई या जेवण झाल्यानंतर आपल्या मुलाकडे झोपण्यास गेल्या.

आज सकाळी उठल्यानंतर त्या घरी गेल्या. तेव्हा त्यांना घराच्या मागच्या दाराचे कुलूप तुटलेले आढळले. घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले होते. कपाट उघडे होते. त्यांनी कपाट चेक केले असता त्यांना कपाटातील 9 तोळे सोन्याचे दागिने व 45 हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. घरफोडीत चोरट्यांनी एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कमलबाईने आपल्या मुलाला घरफोडीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात बीएनएसच्या कलम 331(4), 305(A) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अनिल बेहरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रायबोले करीत आहे. चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.