पीआरसीचा दौरा रद्द झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत आनंदी वातावरण
घाटंजीत पोहचले झरी तालुक्यातील अधिकारी
सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात 16 व 17 फेब्रुवारीला पीआरसीचा दौरा निश्चित झाल्याने पंचायत समिती सह ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग व इतर कार्यालयाची साफसफाई रंगरंगोटी करून कागदांची जुळवाजुळव करून तयारीत बसून होते. परंतु ऐन वेळेवर झरी येथील दौरा रद्द झाला व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर जाधव व त्यांचे सहकारी याना घाटंजी येथे बोलविण्यात आले. घाटंजी येथे आलेल्या पीआरसीची चमूनी तालुक्यातील माहिती व गटविकास अधिकारी यांचे साक्ष नोंदविली असल्याची माहिती मिळाली.
तालुक्यात पीआरसीची टीम न आल्याने अनेक ग्रामवासीयांची हिरमोड झाला. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड आहे. तसेच आरो प्लांट, मनरेगा अंतर्गत रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, सिमेंट रोडच्या कामात झालेला सावळा गोंधळ गावकरीच उघड करून देण्याचा मानसिकतेत होते. परंतु पीआरसीचा दौरा रद्द केल्याने त्यावर पडदा पडला आहे.
पीआरसीचा दौरा रद्द झाल्याची माहिती तालुक्यात येताच सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी एकदम खुश झाले व चेहऱ्यावर हसू पहायला मिळाले. पीआरसीचा अचानक दौरा का रद्द झाला यावरही विविध चर्चा सुरू आहे.
हे देखील वाचा: