जब्बार चीनी, वणी: 18 जानेवारी उपचारादरम्यान आकाश पेंदोर या रंगनाथ नगर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शनिवारी दिनांक 23 जानेवारी रोजी वणीतील नागरिकांनी कॅडल मार्च काढून आकाशला न्याय द्यावा अशी मागणी केली. वणीतील टिळक चौकात दोन मिनिटांचे मौन ठेऊन आकाशला श्रद्धांजली वाहण्यात आली. या कँडल मार्चमध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोमवारी दिनांक 18 जानेवारी रोजी आकाश उर्फ विकास पेंदोर हा रंगनाथ नगर येथील तरुण तब्येत ठिक नसल्याने जत्रा रोड येथील डॉ. पद्माकर मत्ते यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून त्याला लस दिली व औषधे लिहून दिली. मात्र घरी आल्यावर त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे आकाशला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉ मत्ते यांच्या दवाखान्यात धाव घेतली. तिथे त्यांनी डॉ. पद्माकर मत्ते यांना मारहाण करत त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली होती. आकाशचा मृत्यू हा डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने झाला असे आकाशच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हे देखील वाचा: