एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट, ऑफर केवळ रविवार पर्यंत

मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे गणतंत्र दिन ऑफरला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0

विवेक पिदूरकर: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे 26 जानेवारी निमित्त ग्राहकांसाठी खास ‘रिपब्लिक डे’  ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या ऑफरचे प्रमुख आकर्षण एसी ठरत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रँडेड एसीवर 40 टक्यापर्यंतची घसघशीत सुट दिली जात आहे. याशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही 30 टक्यांपर्यंत सुट आहे. तसेच अनेक वस्तूंवर एक गिफ्टही उपलब्ध आहे. ही ऑफर केवळ रविवार पर्यंत असल्याने ग्राहकांनी त्वरित याचा फायदा घेऊन मोठी बचत करावी असे आवाहन मयूर मार्केटिंग तर्फे करण्यात आले आहे.

मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज) येथे आयएफबी, हायर, हिताची, डायकिन, पॅनासॉनिक, ब्लु स्टार, एलजी, वोल्टास, सॅमसंग इ. कंपनीच्या एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. याशिवाय यात ग्राहकांना एसीचे मोफत इन्स्टॉलेशनही करून दिले जाणार आहे. यात ग्राहकांची तब्बल 15-20 हजारांपर्यंतची बचत होणार आहे. शोरुममध्ये 1 टन, 1.5 टन व 2 टन इतक्या कॅपिसिटीचे एसी उपलब्ध असून 3,4 व 5 स्टार एसी ग्राहकांना खरेदी करता येईल. यामुळे विजेची बचत होणार आहे. या ऑफरचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सॅमसंगचा 1.5 टन एसी केवळ 29990 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही भारी सूट
सोनीच्या एलईडी टीव्हीवर 30 टक्यांपर्यंतची सूट आहे. यात 32 इंचाची एलईडी टिव्ही केवळ 17990 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर फ्रिजवर 15 हजारांपर्यंतची सूट आहे. याशिवाय फ्रिज 8990 रुपयांपासून ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय प्रत्येक फ्रिजवर एक इलेक्ट्रिक किटली गिफ्ट दिली जाणार आहे. तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. वॉशिंग मशिन 7490 रुपयांपासून उपलब्ध आहेत. प्रत्येक वॉशिंग मशिनवर जयपान कंपनीची एक इलेक्ट्रिक प्रेस गिफ्ट दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ रविवार 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

मयूर मार्केटिंगमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू केवळ 1 रुपयाच्या डाऊनपेयमेन्टवर* ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय खरेदी केलेल्या या वस्तूंसाठी बजाज फायनान्सची 0 टक्के व्याजदरावर सुविधा देखील मिळणार आहे. सोनी कंपनीच्या वस्तूंव्यतिरिक्त शोरूममध्ये सॅमसंग, एलजी, पॅनॉसॉनिक, आयएफबी, बॉस्च, व्हर्लपूल, हायर इत्यादी प्रसिद्ध कंपनीचे प्रॉडक्ट देखील उपलब्ध आहेत. सोबतच बजाज कंपनीचा मिक्सर देखील उपलब्ध आहे.

जुन्या दरात वस्तू उपलब्ध
दरवर्षी बजेटमध्ये इलेक्टॉनिक्स वस्तूंचे दर वाढतात त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उन्हाळ्यात एसीच्या किमती वाढतात. त्यातच बजेटमुळे ही किंमत आणखीन अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही एसीवर ग्राहकांना सर्वाधिक सूट दिली आहे. ही ऑफर केवळ एका आठवड्यासाठी असल्याने आता केवळ चार दिवस ही ऑफर शिल्लक आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्याचा लाभ घेऊन घसघशीत बचत करावी. जर ग्राहकांना डेमो हवा असेल तर त्याची सुविधाही शोरुममध्ये आहे.
– बतरा बंधू, संचालक मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम)

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंक हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. गणतंत्र दिनानिमित्त ग्राहकांसाठी मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरुम) फेस्टिव्हल ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी मयूर मार्केटिंग (सोनी शोरूम) माहेर कापड केंद्राच्या बाजूला, मार्केट रोड वणी येथे भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963

* अटी व शर्ती लागू

हे देखील वाचा:

आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी वणीत कॅन्डल मार्च

Leave A Reply

Your email address will not be published.