कारची बाईकला धडक, तीन जखमी

जखमीत वणी पोलिसांचे कुटुंब

0

नागेश रायपुरे, मारेगाव : पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबाला घेऊन पांढरकवड्यावरून वणीकडे बाईकने जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या कारने बाईकला धडक दिली. बाईकवरील तिघे त्यात जखमी झालेत. ही घटना तालुक्यातील बोटोनीजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली.

Podar School 2025

सचिन गाडगे हे वणी पोलीस विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते आज पांढरकवड्यावरून वणीकडे आपल्या पत्नी व मुलीसह (MH 29 AZ 3121) दुचाकीने येत असताना मागून येणाऱ्या कारने (MH 29 BP 0058 ) दुचाकीला धडक दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात वणी येथील पोलीस शिपाई सचिन गाडगे यांच्यासह पत्नी व मुलगी जखमी झालेत. जखमींना करंजी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना यवतमाळ येथे हलवण्यात आले. दुचाकीला धडक देणाऱ्या कारचालक विजया भेंडारे या बोटोणीयेथील आश्रमशाळेमध्ये शिक्षिका असल्याचे बोलले जात आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.