मुकुटबन केंद्रावर सोमवार पासून सीसीआयची कापूस खरेदी
नोंदणीशिवाय खरेदी नाही, नोंदणीसाठी मोबाईल नंबर केला जाहीर
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना बहुप्रतीक्षेनंतर दिलासा दायक बातमी मिळत आहे. मुकुटबन केंद्रावर २० एप्रिल सोमवार पासून सीसीआय व खासगी कापूस खरेदी सुरू होणार आहे. संचारबंदी मुळे कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. ज्यामुळे हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडलेला आहे.
२० एप्रिल पासून मुकुटबन केंद्रावर सीसीआय व खाजगी व्यापारी यांची कापूस खरेदी चालू करण्यात येणार आहे. त्या पूर्वी ज्या शेतक-यांकडे FAQ दर्जाचा सीसीआयच्या नियमात बसणार असा कापूस आहे. त्या शेतकऱ्यांनी २० ते २५ एप्रिल दरम्यान नोंदणी सकाळी १० ते दुपारी 2 पर्यंत लिपिक, विठ्ठल उईके मो नं. 9922036098 , कनिष्ठ लिपिक दयाकर एनगंटीवार मो नं. 9075865411 येथे करावी.
कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येताना शेतकरी व वाहन चालक याना मास्क लावणे अनिवार्य आहे. वाहनाला प्रवेश दारावरच फवारणी केल्या शिवाय व साबणाने धुतल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.
नोंदणी करावी व फोन किंवा एसएमएस आल्या शिवाय कुणीही माल केंद्रात आणु नये व नोंदणी च्या कालावधीत नोंदणी केले त्याच शेतकऱ्याचा कापूस घेतल्या जाईल त्या नंतर केंद्र बंद केल्या जाईलअसे आवाहन कृषी उत्पन्न समिती चे सभापती संदीप बुररेवर उपसभापती संदीप विंचू व सचिव रमेश येल्टीवार यांनी केले आहे.