सुशील ओझा, झरी: शासनाने बहुप्रतीक्षेनंतर सीसीआयची कापूस खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 4 मे रोजी सकाळ 7 वाजेपासून मुकूटबन येथे ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदीची सुरुवात करण्यात आली. सचिव रमेश येल्टीवार संचालक सुनील ढाले राजीव आस्वले अरुण एनगंटीवार यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीची सुरवात करण्यात आली.
यावेळी बाजार समितीकडून शेतकऱ्यांना सोशल डिस्टस्टिंग, चारचाकी सैनिटायजरिंग करणे, शेतकऱ्यांना सैनिटायझरने हात साफ करणे इ. साठी सुविधा देण्यात आली होती. कापूस खरेदी सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत तीन टप्प्यात ३० शेतकऱ्यांच्या गाड्या घेण्यात येत आहे. १२५७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून २२ मे पर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
पहिल्या दिवशी ३० गडयापैकी २८ गाड्या घेण्यात आल्या तर २ गाड्यातील कापूस खराब असल्याने रद्द करण्यात आल्या. तरी शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेवर कापसाची गाडी आणावी असे आवाहन सभापती संदीप बुरेवार व सचिव रमेश येल्टीवार यांनी केले आहे.