दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन ‘असे’ झाले साजरे…

आतला उत्साह कायम, बाह्य  नसला, तरीही

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन साधेच साजरे झालेत. पंजाब सेवा संघाची रावणदहनाची गेल्या 64 वर्षांपासूनची परंपरा आहे. परन्तु परंपरा अखंडित राहावे म्हणून रविवार 25 ऑक्टो. रोजी गर्दी न करता प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम पार पडला.  धम्मचक्र प्रवर्तनदिनाला होणारी प्रभातफेरी व प्रबोधनांचे कार्यक्रमही यंदा झाले नाहीत. मात्र ठिकठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली. या वेळी उत्साह नसला तरीही आतला उत्साह सर्वांचाच कायम होता.

Podar School 2025
सलग 64 वर्षा पासुन सुरु असलेले विजया दशमीच्या दिवशी येथील जत्रा मैदानात होणारे पंजाब सेवा संघाचे रावणदहनचे कार्यक्रम या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. पंजाब सेवा संघ, पंजाब नवयुवक मंडळ व पंजाबी महिला मंडळ तर्फे एका वाहनात राम, लक्ष्मण, सीता, हनुमानची झांकी काढून 5-6 जणांच्या उपस्थितीत रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरवर्षी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक कार्यक्रमास बंदी असल्याने तुर्तास ह्या वर्षी रावण दहनाचा कार्यक्रम औपचारिकरित्या करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

धम्मचक्र प्रवर्तनदिन यंदा नियमांच्या चौकटीत साजरा झाला. सकाळी 9 वाजता बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोळा झाले. तिथे सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसेच पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. पंचशीलनगर, दामले फैल, विठ्ठलवाडी, सम्राट अशोकनगर, रंगनाथनगर, विद्यानगरी इथले विहार, पंचशील ध्वज व अन्य ठिकाणी एकत्र येथ बुद्धवंदना झाली. याशिवाय लालगुडा, चिखलगाव इत्यादी गावात देखील साध्या पद्धतीने धम्म चक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

बहुतांश सर्वांनीच आपापल्या घरी, कार्यालयांमध्येच बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून हा दिवस साजरा केला. सोशल मीडियावरून सदिच्छा आणि विचारांची देवाणघेवाण झाली. विजयादशमीसाठीही लोकांनी आप्टाचे सोनंं देण्याऐवजी सोशल मीडियावरून डिजिटल शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा केला. शिवाय मोजक्याच आप्तांच्या भेटी घेतल्यात.

एरवी दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिनाला होणारं खानपान, कपडेलत्ते, आनंद आणि उत्साहात कुठेच कमी नव्हती. प्रत्यक्ष भेट अनेकांनी जाणीवपूर्वकच टाळली. शुभेच्छांच्या जाहिरातीही अगदीच तुरळक झळकल्यात. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन प्रत्येकानेच आपापल्यापरीने साजरा करण्याचा प्रयत्न केला.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.