दुसऱ्या दिवशी झाला शेलू (बु)येथील युवकाचा मृत्यू

शनिवारी घेतले होते विष, दसऱ्यालाच गावावर शोककळा

0
Sagar Katpis

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलू (बु) येथील हनुमंत पुंडलिक ढवस (34) या युवकाचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्याने  दि 24 तारखेला दुपारी 4 वाजता विष प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला वणीतील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.

त्या युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. परंतु त्याच्या परिवाराने त्याला वणी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केले. दि. 25ला त्या व्यक्तीचा उपचारदारम्यान मृत्यू झाला .

ऐन दसऱ्याच्या दिवशी युवकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली. वणीतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांना देण्यात आले. मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.अधिक तपास शिरपूरचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एस. खांडेकर आणि पी.झुणूनकर करीत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!